shivendrasinhraje bhosale , Satara, Kass, Encroachment  saam tv
महाराष्ट्र

Shivendrasinhraje Bhosale : पहिल्यांदा आमच्यावर बुलडोजर चालवा..., शिवेंद्रसिंहराजे भडकले

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्थानिक भूमिकारांच्या उभे पाठीशी उभे राहत सातारा जिल्हा प्रशासनाला याविषयी जाब विचारला आहे.

ओंकार कदम

सातारा : कास (kass) परिसरात भूमिपुत्रांनी स्वत:च्या जागेत बांधकाम केले आहे. ज्यांनी नियमबाह्य बांधकाम केले असेल तर जरुर पाडा परंतु याेग्य पद्धतीने असलेल्या बांधकामांवर कारवाई करणार असाल तर पहिल्यांदा आमच्यावर बुलडाेजर चालवा असं आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendrasinhraje bhosale) यांनी म्हटलं आहे. राजेंनी हा प्रशासनास एक इशाराच दिला असल्याने आता सातारा जिल्हा प्रशासनाच्या भुमिकेकडं लक्ष लागून राहील. (Kass Latest Marathi News)

साताऱ्याहून कास पठाराकडे जाणारा रस्त्यावर बहुतांशी भागात अनधिकृत पद्धतीने हॉटेल बांधकामे झाले असल्याबाबत प्रशासनाने स्थानिकांना नोटीस बजावली आहेत. यामुळे स्थानिक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. याची व्यथा सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे त्यांनी मांडल्या.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्थानिक भूमिकारांच्या उभे पाठीशी उभे राहत सातारा जिल्हा प्रशासनाला याविषयी जाब विचारला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या स्वतःच्या जागेत जर बांधकाम केले असेल तर ते बांधकाम अनधिकृत कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्या परिसरात वनविभाग सरकारी जागा मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जर एखादा बांधकाम असेल ते काढावे. मात्र भूमिपुत्रांनी जर स्वतःच्या जागेत बांधकाम करून देखील प्रशासन कारवाईचा घाट घालत असेल तर बांधकाम पाडताना पहिल्यांदा आमच्यावर बुलडोजर चालवावा आणि नंतर बांधकामे पाडावीत असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT