udayanraje bhosale & shivendraraje bhosale 
महाराष्ट्र

सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीचा काय मान ठेवलात? उदयनराजेंना सवाल

स्वतःचा स्वार्थ आला की उदयनराजे जुळवून घेतात अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

साम न्यूज नेटवर्क

सातारा (satara) : सातारा पालिकेत (satara muncipal council) सातारा विकास आघाडीमधील सर्वसमान्य कुटुंबातील नगराध्यक्षा निवडून आल्या. परंतु खूद्द नगराध्यक्ष माधवी कदम (madhavi kadam) विकासकामांच्या उदघटानाला का येत नाहीत किंवा का तुम्ही बाेलावात नाही. त्यांनी तुमचा फाेन घेतला नाही की त्या परगावी हाेत्या असा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांना विचारला आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज सुरुची बंगला येथे पत्रकार परिषद घेत उदयनराजेंवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. ते म्हणाले पालिकेत सर्वसामान्य स्त्री सर्वाधिकार देणार असे तुम्ही जनतेला सांगितलं हाेते. आता सर्वसामान्य घरातील स्त्री काेठे गेली? काय मान तुम्ही ठेवला आहे सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीचा. नगराध्यक्षांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचे कारण काय असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी विचारला आहे.

आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांच्या आम्ही जनतेमधील राजे आहाेत या वक्तव्यावर शिवेंद्रराजे म्हणाले सगळेच जनतेचे राजे आहेत. आम्ही लाेकशाही मानणारी माणसं आहाेत. आम्ही कधीच राजेशाही थाटा वागलाे नाही. त्यामुळे जनता आमच्यावर प्रेम करते. राजकारणात त्यांच्याशी माझी दाेन हात करण्याची तयारी असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

शाहूपूरी (shahupuri) ग्रामपंचायतीसह त्यांच्याकडे पंचायत समिती, जिल्हा परिषद ताब्यात हाेती. तरी देखील उदयनराजेंच्या बगलबच्यांनी हद्दवाढ हाेऊ नये यासाठी प्रयत्न केले. आज ते म्हणाताहेत माझ्यामुळं शाहूपूरीवासियांनी पाणी मिळाले नाही मग २० वर्ष सत्ता काेणाची हाेती हे सर्वजण जाणतात असं ही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. स्वतःचा स्वार्थ आला की ते जुळवून घेतात अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT