Shivendraraje Bhosale News :
शेतात राबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation latest marathi news) देऊन दाखवलं आहे. आता खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करावे असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (mla shivendrasinhraje bhosale) यांनी सातारा (satara) येथे साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. (Maharashtra News)
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्या नंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्य सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, मी पहिल्या पासून सांगत होतो हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल.
शिवेंद्रसिंहराजे पुढे बाेलताना म्हणाले यापूर्वी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिले होते पण उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या काळात ते टिकल नाही.
यापूर्वीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही अशी खंत व्यक्त करीत राजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी तो न्याय मिळवून दिल्याचे नमूद केले.
या लढ्याच्या यशाबद्दल राजेंनी मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांचे अभिनंदन करत खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले शेतात राबण्यात कोणता कमीपणा वाटताे राऊत यांना. मुख्यमंत्री हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेतात राबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवले. आता संजय राऊत यांनीनी मुखमंत्र्यांचे अभिनंदन करावे असेही राजेंनी म्हटले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.