shashikant shinde & shivendraraje bhosale 
महाराष्ट्र

त्यावेळी तुम्ही काय केलं; राजेंचा शशिकांत शिंदेंना प्रश्न

रामराजेंनी नावे जाहीर केली त्यावेळी एक वर्षासाठी निवड असल्याचे सांगितले आहे.

ओंकार कदम

सातारा : (कै.) अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्यावर राष्ट्रवादीत असताना झालेल्या कुरघोड्यांच्या वेळीस तुम्ही काेठे हाेता. ज्यावेळी भाऊसाहेब महाराज यांना मंत्री पदासाठी डावलले. त्यावेळी तुम्ही नेमके काेणते प्रयत्न केले. जिल्हा बॅंकेत अध्यक्षपद मलाच मिळावे असा माझा मुळीच अट्टाहास नव्हता. मला पाच वर्षे अध्यक्ष करण्यासाठी तुम्ही हरकत घेतली होती हे विसरलात का? तुम्ही पाहिजे तेवढं वातावरण तापवा तुम्हाला थंड करून घरी बसवण्याची ताकद आमच्यात आहे असा प्रतिहल्ला भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी सातारा (satara) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांच्यावर येथे केला.

आमदार शिंदे यांनी माझी शिफारस नसल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना बॅंकेचे अध्यक्षपद दिले नाही असे म्हटलं हाेते. त्यास आज सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मलाच बॅंकेचे अध्यक्षपद मिळावे असा अट्टहास नव्हता. विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांना सूचक मी आहे. चेअरमन पदावर माझं काही चालत नाही. शशिकांत शिंदेंचा जावळीत झालेला पराभव हा त्यांच्या गटबाजीमुळे झाला आहे. रामराजेंनी नावे जाहीर केली त्यावेळी एक वर्षासाठी निवड असल्याचे सांगितले आहे. गटबाजीसाठी शशिकांत शिंदेंना जावळी तालुकाच का दिसतो? असा प्रश्न राजेंना विचारला आहे. शशिकांत शिंदेंचा काय डाव आहे हे नक्कीच आम्ही समजू शकतो. मी कुठे जायचे हे त्यांनी सांगायची गरज नाही. ते मी आणि माझे कार्यकर्ते ठरवू. तुम्ही पाहिजे तेवढे वातावरण तापवा, तुम्हाला थंड करून घरी बसवण्याची ताकद आमच्यात आहे असा इशारा देखील राजेंनी आमदार शिंदेंना दिला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

SCROLL FOR NEXT