Shivendra Raje Bhosale ओंकार कदम
महाराष्ट्र

उदयनराजेंच्या टीकेला शिवेंद्रराजेंचे जोरदार प्रतिउत्तर म्हणाले...

मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडुन जाईन असा टोला लगावत साताऱ्यातील एमआयडीसी संपायला उदयनराजेच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितल आहे.

ओंकार कदम

सातारा - साताऱ्यातील पंडीत आॅटोमोटीव्ह कंपनी आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय करणाऱ्या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं पाहिजे असं विधान खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी शिवेंद्रराजेंना (Shivendra Raje Bhosale) उद्देशुन केलं होतं. या नंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडुन जाईन असा टोला लगावत साताऱ्यातील एमआयडीसी संपायला उदयनराजेच जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितल आहे.

हे देखील पहा -

तसंच कारखानदारांकडुन हप्ते घेणं त्यांना दमटाटी करणं यामुळे सुद्धा साताऱ्यातील एमआयडीसी मध्ये कंपन्या आल्या नाहीत आणि असलेल्या कंपन्या निघुन गेल्या असल्याचा मोठा आरोप आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केला आहे. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपुर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे. त्यामुळे उदयनराजेंचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचं ही शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT