Chandrapur Morcha, shivani wadettiwar saam tv
महाराष्ट्र

Shivani Wadettiwar In Morcha : कंत्राटीकरण, शाळा खाजगीकरण धोरणाविरोधात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माेर्चा

आता शाळांच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून आपल्या मर्जीतील लोकांना शाळा विकल्या जात आहेत असा दावा आंदाेलकांनी केला.

संजय तुमराम

Chandrapur News : राज्य शासनाच्या पद कंत्राटीकरण व शाळा खाजगीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रातून याविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. या निर्णयाचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (शुक्रवार) चंद्रपूर जिल्ह्यात माेर्चा काढण्यात आला. या माेर्चात आंदाेलकांच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार (shivani wadettiwar) या सहभागी झाल्या हाेत्या. (Maharashtra News)

चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थी व बेरोजगार युवक संघटना आदींनी जाेरदार सर्वपक्षीय मोर्चा काढत आपला आक्रोश व्यक्त केला. सरकारने आधी कंत्राटीकरणाला मान्यता दिली आणि आता शाळांच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून आपल्या मर्जीतील लोकांना शाळा विकल्या जात आहेत असा दावा आंदाेलकांनी (aandolan) केला.

दरम्यान गरिबांच्या मुलांनी उराशी बाळगलेले सरकारी नोकरीचे स्वप्न कधी साकार होणार असा सवाल करत केवळ सरकारच्या गुलामांनीच शिक्षण घ्यायचे व प्रगती करायची अशी सरकारची भूमिका आहे का, असा सवाल आंदोलक नेत्यांनी या जनआक्रोश मोर्चात विचारला. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून प्रारंभ झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून लहान मुलांच्या जीवाशी खेळ

पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

Raigad Crime: रायगड हादरले! महिलेची आत्महत्या, कुंडलिका नदीत मारली उडी

ODI ICC Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा दबदबा; प्रिन्स गिलने किंग कोहलीला टाकलं मागे, रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर?

SCROLL FOR NEXT