Yavatmal online fraud case saam tv
महाराष्ट्र

स्वस्तात सिमेंट घ्या, स्टिल घ्या; कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा भामटा गजाआड

नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा (crore rupees fraud) घालणाऱ्या भामट्याच्या बेळगावच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिवानंद कुंभार असं (Shivanand kumbhar arrested) अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. स्वस्तात सिमेंट व स्टिल घ्या, स्टील सिमेंट नको असेल तर रोख रक्कम गुंतवा आणि काही महिन्यातच दुप्पट परतावा घ्या, असं आमिष कुंभारने नागरिकांना दाखवलं होतं. त्यानंतर नागरिकांनी गुंतवणूक केलेले पैसे घेवून कुंभार फरार झाला होता. मात्र, बेळगाव पोलिसांनी (Police) या गंभीर प्रकाराची तातडीनं दखल घेवून आरोपी कुंभारवर कारवाई केलीय. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपासासाठी कुंभारला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी यांनी शिवानंद कुंभार यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात ३ लाख २४ हजार रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला.

आरोपी शिवानंद कुंभारला या प्रकरणातील तपासाठी बेळगाव पोलीसांकडून शनिवारी कोपरगाव पोलीसांनी ताब्यात घेवून कोपरगाव न्यायालयात हजर केले. आरोपीला न्यायालयाने ५ जुलै पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवानंद कुंभार याच्यावर विविध ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

SCROLL FOR NEXT