Vilas Sandipan Bhumre injury  Vilas Sandipan Bhumre injury
महाराष्ट्र

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

Vilas Bhumare News : छत्रपती संभाजीनगरमधील पैठणचे उमेदवार विलास भुमरे दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Vilas Sandipan Bhumre injury : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे हे आज पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्याने कोसळले. त्यामुळे विलास भुमरे यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. भुमरे यांच्यावरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विलास भुमरे यांच्यावर थोड्याच वेळात शस्त्रक्रिया होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून गेल्या पंधरा दिवसापासून ते रात्रंदिवस प्रचार करत आहेत. विलास भुमरे हे खासदार आणि माजी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. ते पैठणमध्ये महायुतीकडून मैदानात उतरले आहेत. आज पहाटे भोवळ आल्यामुळे भुमरे कोसळले. ऐन विधानसभा निवडणुकीत दुखापतीमुळे विलास भुमरे यांच्यावर प्रचार बंद करण्याची वेळ आली आहे. विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे नियोजित दौरे रद्द करण्यात आलेत.

विलास भुमरे हे खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. विलास भूमरे यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती म्हणून काम पाहिलेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून विजय मिळवला. संदीपान भुमरे दिल्लीच्या राजकारणात गेल्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. पैठण मतदारसंघात विलास भुमरे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्यासोबत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून विलास भूमरे यांनी प्रचाराचा धडाका लावला. सभा अन् गावभेटी करत त्यांनी जोरात प्रचार केला. पण मोक्याच्या क्षणी त्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार थांबलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT