Former Shiv Sena MLA Dyaneshwar Patil passed away Saam TV
महाराष्ट्र

Shivsena News : बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हरपला; ठाकरे गटाच्या माजी आमदाराचे निधन

Former Shiv Sena MLA Dyaneshwar Patil passed away : शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले आहे.

Satish Daud

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झालं आहे. फुफुसला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल बुधवारी रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते दीर्घ आजारामुळे पुण्यात उपचार घेत होते. बुधवारी रात्री उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

तसेच भोत्रा रोडच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान, सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते.

याच काळात ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. 1995 आणि 1999 अशा दोन वेळेस ते भूम परंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदार पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कठीण काळातही ज्ञानेश्वर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाण्याने शिवसैनिकावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांची दहशत; १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

SCROLL FOR NEXT