Shirsat vs Gaikwad: 
महाराष्ट्र

Shirsat vs Gaikwad: काँग्रेसचा मुख्यमंत्री नको असेल; महिला मुख्यमंत्रिपदावरून शिरसाट आणि गायकवाड यांच्यात जुंपली

Shirsat vs Gaikwad: महिला मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आमदार आणि काँग्रेसच्या खासदारामुध्ये वाद जुंपलंय.

Bharat Jadhav

महिला मुख्यमंत्रीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यात वाद जुंपलाय. बघायला मिळत आहे. महिला मुख्यमंत्रीसाठी रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे ह्या दावेदार असल्याचं खासदार गायकवाड यांनी सांगितलं होतं. मात्र याच विधानावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांना टोला लागवलाय. त्यांच्या मनात काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये, असं असावं' अशी कोपरखळी शिरसाट यांनी खासदार गायकवाड यांना लगावली. त्यामुळे आता शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये महिला मुख्यमंत्रीपदाचा नवा वाद निर्माण झालाय.

महिला मुख्यमंत्री झाल्यास तुम्हाला आवडेल का? या प्रश्नावर 'माझं उत्तर हो असेल',असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. माध्यमांनी मंगळवारी महाविकास आघाडीमधून महिला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार कोण असेल? तुमच्या डोळ्यासमोर कोणते चेहरे आहेत? असा प्रश्न खासदार गायकवाड यांना केला होता. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे तसेच शिवसेनेतून रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार आहेत, मला महिला मुख्यमंत्री होणार असले तर आवडेल, असं उत्तर गायकवाड यांनी दिलं होतं.

यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला, 'भाजपमध्ये महिलांना मंत्रिपदही दिले जात नाही, पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही. महिला मुख्यमंत्री महाविकास आघाडीपैकी कोणत्याही पक्षाची झाल्या तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो, तरीही महिला राजकारणात येतात. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहेत.

सोनिया गांधींना आम्ही संघर्ष करताना पाहिलंय. महिला मुख्यमंत्री झाली तर मला आनंदच होईल. 50 टक्के आरक्षण देण्यासाठी आपण पहिलं राज्य होतं. महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद होईलच.' असं देखील खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

आता वर्षा गायकवाड यांच्या या विधानाने शिंदे गट मात्र आक्रमक झाला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी या सर्व प्रकरणात वर्षा गायकवाड यांना टोला लगावला. वर्षा गायकवाड यांच्या मनात काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये, असं असावं. त्यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे घेतली. कदाचित काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासोबत त्यांचा काही अंतर्गत वाद असेल, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार मुख्यमंत्री होऊ, नये असं त्यांना वाटत असेल.'' असा टोला शिरसाट यांनी लगावला. दरम्यान, एकीकडे हा वादाचा मुद्दा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

SCROLL FOR NEXT