Shiv Sena workers protest against rebel MPs amid escalating political tensions in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

राऊत म्हणतात, खासदारांना तुडवा, 'ऑपरेशन टायगर'नंतर 'ऑपरेशन तुडवा'

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेची राडा संस्कृती दिसण्याची शक्यता आहे...कारण ठाकरेसेनेचे सहा खासदार फुटले आहेत. त्यामुळे ठाकरेसेनेत संतापाची लाट उसळली आहे. आता ठाकरेसेनेनं फुटलेल्या खासदारांसाठी ऑपेशन तुडवाची हाक दिलीय. नेमकं काय आहे हे ऑपरेशन तुडवा? राज्यातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात याचे पडसाद उमटले...पाहूयात हा रिपोर्ट......

Snehil Shivaji

फुटीर आमदार-खासदारांना रस्त्यावर तुडवा अशी गर्जना करत बाळासाहेब ठाकरेंनी एकेकाळी शिवसैनिकांच्या मनगटात अंगार पेटवला होता. अशीच गर्जना देण्याची वेळ ठाकरेसेनेवर आज येऊन ठेपलीय. त्यामुळेच ठाकरेसेनेनं आता ऑपरेशन तुडवाची घोषणा दिलीय. कालपर्यंत संभाव्य फुटीवर संतापून संजय राऊतांनी फुटीर खासदारांना शिव्या हासडल्या होत्या. मात्र या बंडखोर खासदारांनी पक्षाचा व्हिप झुगारून थेट पक्ष नेतृत्त्वालाच आव्हान दिलंय. त्यामुळे आता बंडखोर खासदारांना तुटवण्याची आणि त्यांच्या मतदारसंघात राडा करण्याची सादच ठाकरेसेनेनं शिवसैनिकांना घातलीय. एवढंच नव्हे तर शरद पवारही या फुटीविरोधात मैदानात उतरणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय.

शिवसेनेत ही काही पहिली फूट नाही. यापूर्वी तब्बल तीन वेळा मोठ्या फुटीला शिवसेनेला सामोरं जावं लागलंय. भुजबळ आणि राणे फुटले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. तर शिंदेंनी २०२२ मध्ये बंड केल्यानंतरही राज्यात शिंदेसेना आणि ठाकरेसेनेच्या शिवसैनिकांमध्ये राडे झाले होते. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राडा करण्याची धमक नसल्याची खिल्ली गिरीश महाजनांनी उडवलीय. तर मग बंडखोरांसाठी सुरक्षेचा लवाजमा कशासाठी असा सवाल संजय राऊतांनी केलाय़.

तर दुसरीकडे राऊतांनी राडे करण्याचा इशारा दिल्यानंतर त्याचे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरेसेनेचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. खासदार संजय देशमुखांविरोधात यवतमाळमध्ये शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. संजय देशमुख यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करतण्यात आलं. तसंच खासदार रस्त्यावर दिसले की त्यांना तुडवणार असल्याचा इशाराच या संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी दिला....बीडमध्ये ठाकरेसेनेच्या फुटलेल्या सहाही खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून तीव्र निषेध करण्यात आलाय. आंदोलकांनी बंडखोर खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परभणीत ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिक आक्रमक झालेत. सोनपेठ संतप्त कार्यकर्त्यांनी जाधवांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत त्यांची अंत्ययात्रा काढली. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलंय..

राज्याच्या रस्त्यांवर पुन्हा संघर्षाला सुरुवात झालीये. हा रोष पाहताच सरकारनं या बंडखोर खासदारांना थेट वाय दर्जाची सुरक्षा देऊन संभाव्य राड्यातून संरक्षण देण्याचा प्रयत्न केलाय. राडा म्हणजे शिवसेना...त्यामुळे सगळ्यांनाच शिवसैनिकांचा धाक होता. काळ बदलला, नेतृत्व बदललं, शिवसेनेची शैलीही बदलली. पण पक्षाला लागलेली गळती मात्र थांबली नाही. त्यामुळे आता शिवसैनिक खरोखरच रस्त्यावर उतरून पुन्हा आपली राडेबाज संस्कृती सुरू करणार की हा इशारा केवळ राजकीय दबावतंत्र ठरणार याबाबतच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

Pune Traffic: पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; अंतर्गत हलक्या वाहनांसाठी निर्बंध

नागपूरचं झालं वासेपूर, चुकीचा रस्ता दाखवून पर्यटकांची लूट, चाकूचा धाक दाखवून 8 लाखांचं सोनं लंपास

SCROLL FOR NEXT