sindhudurg, mla vaibhav naik, shiv sena, kudal, acb saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena : पन्नास खोके..माजलेत बोके.., गली गली मे शाेर है..शिंदे सरकार चाेर है.., काेकणात सेना आक्रमक

या माेर्चास शिवसेना शाखा येथून प्रारंभ झाला.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Mla Vaibhav Naik : पन्नास खोके माजलेत बोके...., शिवसेना (shivsena) झिंदाबाद अशा घोषणा देत आज (मंगळवार) सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळ (kudal) येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारच्या विराेधात माेर्चा काढण्यात आला आहे. (Sindhudurg Latest Marathi News)

आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांच्या समर्थनार्थ हा माेर्चा काढण्यात आला आहे. एसीबीनं आमदार वैभव नाईक यांना चौकशीसाठी बाेलावलं हाेते. त्यामुळे नाईक यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुडाळ येथील एसीबीच्या कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढला आहे. (Maharashtra News)

या माेर्चास शिवसेना शाखा येथून प्रारंभ झाला. हा माेर्चा शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या देखील तैनात.

हा माेर्चा एसीबीच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे. माेर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते पन्नास खाेके माजलेत बाेके..., शिवसेना जिंदाबाद, शिंदे सरकार चाेर है अशा घाेषणा देताहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अंगार है..., आमदार वैभव नाईक आगे बढाे अशा घाेषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून साेडला आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT