Sanjay Gaikwad Saam TV Marathi
महाराष्ट्र

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नका, संजय गायकवाडांचा महामुर्खपणाचा सल्ला

Sanjay Gaikwad controversial statement on farmer suicides : शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्येवरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराबाबत त्यांनी नेमकं काय म्हटलं?

Suprim Maskar

Sanjay Gaikwad, farmer suicide controversy : आता बातमी आहे... बेताल विधानासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या एका आमदाराची....शिंदेसेनेच्या एका आमदारानं शेतकरी आत्महत्येवर असंवेदनशील विधान केलयं...त्यामुळे शेतकऱ्यांना महामुर्खपणाचा सल्ला देणारा तो आमदार कोण आहे? आमदारांनं शेतकऱ्यांबाबत काय विधान केलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

गावगुंडाप्रमाणं आमदार निवासातील कॅन्टिन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आणि आपल्या बेताल विधानासाठी राज्यात कुख्यात असलेले शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीय... गायकवाडांनी आता शेतकरी आत्महत्येवरून मुर्खपणाचं विधान करत आमदारकीलाच काळिमा फासण्याचा कारनामा केलाय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्य संस्कारलाही कोणी जाऊ नये, जनावरं बॉडी खातील तेव्हा त्यांना कळेल, अशा शब्दात गायकवाड पुन्हा बरळलेयत.

याआधी संजय गायकवाड यांनी कोणती वादग्रस्त विधानं केली आहेत ते पाहूयात...

13 फेब्रुवारी 2024

वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यातील लॉकेटमध्ये घातल्याचा गायकवाडांचा दावा

सप्टेंबर 2024

'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार' गायकवाडाचं वादग्रस्त विधान

जुलै 2025

गायकवाडांकडून छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान

9 जुलै 2025

आमदार निवासाच्या कँटीनमध्ये निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून कँटीन कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

24 एप्रिल 2025

'घरात घुसून मारेन, जीभ कापून टाकीन', 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबींना धमकी

13 सप्टेंबर 2026

आमदार श्वेता महालेंवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा नेहमीच एक संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत चर्चेतील विषय राहिलाय...मात्र गायकवाडांनी थेट शेतकरी आत्महत्येवरून वादग्रस्त विधान केल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत...

लोकप्रनिधी म्हणून गायकवाडांनी शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी त्यांच्या मृत्यूबद्दल आणि अंत्यसंस्काराबद्दल अशी भाषा वापरणे अत्यंत असंवेदनशीलपणाचं आहे... एकीकडे 5 हजारांची तुटपुंजी मदत देऊन सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय...तर दुसरीकडे दुष्काळामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांचा फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी छळ मांडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झालंय. यातून

त्यांची सुटका करून त्यांना दिलासा देण्याचं सोडून सत्तेत असेलेल आमदार गायकवाड नको ते बरळतायत. त्यामुळे अशा आमदारांवर पक्षानं आणि सरकारनंही कारवाई करण्याची गरज आहे.

संजय जाधव, साम टिव्ही, बुलढाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० नाही तर ₹१५०० च येणार, तारीखही आली समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

MLC Election: नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा उलटफेर; भाजपचे टेन्शन वाढलं, लीड घटली

Rock Salt Vs Sea Salt: सैंधव मीठ, समुद्री मीठ की इतर कोणते मीठ? रोजच्या जेवणासाठी कोणते मीठ वापरावे?

Pratap Asbe Death News: राजकारणाचा सखोल अभ्यासक हरपला! ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन

Matheran Train : घाटमार्ग पुन्हा गजबजणार! माथेरानची राणी शुक्रवारपासून पुन्हा धावणार, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

SCROLL FOR NEXT