Raj thackeray Saam
महाराष्ट्र

Uday Samant: उदय सामंत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; "शिवतीर्थावर" नेमकी कोणती चर्चा रंगली?

Uday Samant Meets Raj Thackeray:शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Bhagyashree Kamble

शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या तोडांवर या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भेट झाल्यानंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भेटीमागचं कारण सांगितलं आहे.

उदय सामंत म्हणाले, "मराठी माणसांच्या संदर्भात ज्या घडामोडी चालू आहेत, त्यासंदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलावलं होतं. इथे येण्यापूर्वी मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आलो आहे.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या काही संस्था आहेत, बँका आहेत, त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. किंवा त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडतात, त्याचा प्रतिबंध कसे करायचे, त्यासंदर्भात राज ठाकरेंनी काही सुचना दिल्या. यासंदर्भात मी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यात काही सुधारणा करता येतील, त्या दृष्टीने निर्णय घेऊ", असं उदय सामंत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांचे ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT