Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; फडणवीसांचे आव्हान

मोदींचे नेतृत्वच भारताला पुढं नेऊ शकत. विरोधक देव पाण्यात घालून बसले होते असही ते म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

चार राज्यात भाजपला (BJP) मिळालेलं मत हे विकासाला मिळाले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विकासाचं जे जाळं तयार केलं आहे. त्या विकासाला मतं लोकांनी दिले आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांना नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) भारतात आणले. मोदींचे नेतृत्वच भारताला पुढं नेऊ शकत. आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. त्यांच स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर केली.

आज नागपूर मध्ये देवेंद्र फडणवीस गोवा (Goa) निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गेले आहेत. नागपूर भाजपने फडणवीस यांचा स्वागत मोठ्या जल्लोषात केले आहे. यावेळी जाहीर सभाही झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. गोवा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है, असा नाराही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.

विरोधकांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. गोव्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस मोठ्या ताकदीने आले होते. यावेळी मी पत्रकारांना सांगितले त्यांची लढाई आमच्याशी नाही. त्यांची लढाई नोटाशी आहे, आणि तसेच झाले त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

आज महाराष्ट्रात (Maharashtra) परिवर्तनाची लढाई आहे. सामान्य माणूस भाजप (BJP) सोबत आहे. ही महाविकास आघाडी नाही, ही महाभकास आघाडी आहे. आम्ही सरकारचा बुरखा फाडत आहे. आज या आघाडीचे दोन मंत्री जेलमध्ये आहेत. आता भाजपच्या नेत्यांच्या विरोधात खोट्या केसेस केल्या जात आहेत. कितीही केलं तरीही तुमचा बुरखा फाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज मी इथून सांगतो येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता आणणार असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणेकरांना दिलासा! शहरात पाणी कपात नाही

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात महत्त्वाचे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम

Famous Actress : लग्नाच्या ४ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट? नवऱ्याला केले अनफॉलो, लग्नाचे फोटोही Delete

Digital Eye Strain: डोळे जळजळणं किंवा खाज येणं याला थकवा समजू नका; या गंभीर समस्यांचा असू शकतो इशारा

SCROLL FOR NEXT