अकोल्यात शिवसेना आक्रमक; 'कोंबडी चोर' म्हणत केले आंदोलन Saam TV
महाराष्ट्र

अकोल्यात शिवसेना आक्रमक; 'कोंबडी चोर' म्हणत केले आंदोलन

यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपर्य वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दरम्यान यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. राज्यभरात नारायण राणे Narayan Rane यांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच तापले आहेत.

हे देखील पहा -

राज्यात ठीक ठिकाणी नारायण राणे यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू आहेत. अकोल्यातही संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा गाढवावर बसवून धिंड काढली. यावेळी राणे यांचा 'कोंबडी चोर’चा पोस्टर घेऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

तर नारायण राणे यांचा कोंबडी घेऊन तयार केलेला पुतळा देखील यावेळी शिवसैनिकांनी जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हणून पडला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये काहीसा संघर्षही झाला. जय हिंद चौक ते गांधी रोड पर्यंत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT