neelam gorhe update news  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, निवासस्थानाबाहेर गोऱ्हेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन

Shiv Sena Activists Turn Aggressive Against Neelam Gorhe: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. यावरून त्यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन सुरू झाले आहे

Saam Tv

पुणे: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावरी एक गंभीर आरोप केला होता . उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे. 'नीलम गोऱ्हे हाय हाय', टायरवाल्या काकू, अशा जोरदार घोषणाबाजी करत नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू आहे.

नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दाखवाव्या

नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील निवसस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नीलम नीलम गोऱ्हेंनी आता पर्यंत 4 वेळा आमदारकी भोगली तसेच विधापरिषदेच उपसभापती पद भोगले मग त्यांनी दिलेल्या 8 मर्सिडीज दाखवाव्या असे आव्हान ठाकरे गटाच्या महिलांनी केले आहे.

खोटे आरोप करणे यांचा उद्योग - किशोरी पेडणेकर

खोटे आरोप करणे यांचा उद्योग झाला आहे. तर काही नेत्यांना खुश करण्यासाठी असे वक्तव्य केले जातात त्यांनी तात्काळ माफी मागावी असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT