shivsena, akola, telhara tashil office saam tv
महाराष्ट्र

Akola News : जागे व्हा...जागे व्हा... शिंदे- फडणवीस सरकार जागे व्हा... तेल्हारा तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या

शिवसैनिक आज कमालीचे आक्रमक झाले हाेते.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज (मंगळवार) तेल्हारा तहसील कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी डफडे बजाव आंदाेलन छेडले. यावेळी आंदाेलकांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. कक्ष अधिकारी येईपर्यंत ठिय्या आंदाेलन सुरु राहणार असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

या आंदाेलनाबाबत शिवसैनिक म्हणाले तालुक्यात बियाणांचा काळाबाजार सुरू आहे तसेच पेरणीच्या तोंडावर बियाण्यांचे भाव अव्वाच्या सव्वा करून टाकले आहेत. अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई अद्यापपर्यंतही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

याबाबत वेळाेवेळी समस्या आणि मागणी करुन ही प्रशासन हालचाली करीत नसल्याने आज प्रशासनाला जागे करण्यासाठी तहसील कार्यालयावर डफडे बजाव आंदोलन (aandolan) छेडल्याचे शिवसैनिकांनी स्पष्ट केले.

दरम्यान उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तेल्हारा येथील तहसील कार्यालयापर्यंत माेर्चा काढत डफडे बजाव आंदोलन केले. त्यानंतर विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी घाेषणाबाजी केली. यावेळी आंदाेलनकांनी (akola) प्रशासनास मागण्यांचे निवेदन दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: व्यवसायात भरभराट होईल पण पैसाही तितकाच खर्च होईल; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

लोकशाहीची लक्तरं, मतदानाची दुकानं, महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, वॉशिंग मशिन, मिक्सर,चांदीचं वाटप

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

SCROLL FOR NEXT