Sambhaji Bhide, independence day 2023, shiv pratishthan hindustan, hindavi swarajya yatra Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या उपस्थितीत उद्या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा, धारक-यांनाे वाचा पाेलिसांची नियमावली

Hindavi Swarajya Yatra : या नियमांचे उल्लंघन हाेऊ नये याची काळजी घ्यावी असेही पाेलिसांनी नमूद केले आहे.

विजय पाटील

Shiv Pratishthan Hindustan News : शिवप्रतिष्ठान हिंदस्थान या संस्थेच्या वतीने काढण्यात येणा-या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेला सांगली शहर पोलिसांनी अटी शर्तींवर परवानगी दिली आहे. या पदयात्रेत संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे हे सहभागी हाेणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानच्या वतीने हणमंत पवार यांनी दिली. (Sambhaji Bhide Latest Marathi News)

स्वातंत्र्यदिना निमित्त (independence day 2023) उद्या (मंगळवार) शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगली शहरातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेस परवानगी देताना पाेलिसांनी धारक-यांना काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन हाेऊ नये याची काळजी घ्यावी असेही पाेलिसांनी नमूद केले आहे.

ही पदयात्रा सकाळी 9 वाजता सुरु हाेईल. या पदयात्रेत संभाजी भिडे यांचीही उपस्थिती असणार आहे. पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आक्षेपार्ह घोषणाबाजी आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पाेलिसांनी दिल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? पावसाळ्यात हीच चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

SCROLL FOR NEXT