Red Fort, Delhi Saam TV
महाराष्ट्र

Shiv Jayanti News: शिवप्रेमींची न्यायालयामध्ये धाव; पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

High Court: अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

शिवाजी काळे

Ajinkya Devgiri Pratishthan : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आग्रा किल्ला परिसरात कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. आग्र्यामध्ये लाल किल्ला परिसरात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे. (Latest Shiv Jayanti)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीनिमित्त आग्रा किल्ला परिसरात कार्यक्रम घेण्यासाठी पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना या आधी आग्रा किल्ला परिसरात परवानगी देण्यात आली आहे. तर मग शिवजयंती बाबत भेदभाव का? असा सवाल अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे विचारण्यात येत आहे.

आग्र्यामध्येच छत्रपती शिवरायांना औरंगजेबाकडून कैद करण्यात आलं होतं. यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी मोठी युक्त लढवण्यात आली. औरंगजेबाच्या तावडीतून महाराजांची ऐतिहासिक सुटका झाली. त्यामुळे याच पराक्रमी घटनेला उजळणी देण्यासाठी शिवप्रेमींनी आग्र्यात शिवजयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते.

परवानगीसाठी मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र दिले. मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्र्यांच्या पत्रानंतरही पुरातत्त्व खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने प्रकरण अखेर कोर्टात गेले आहे. याआधी अदनान सामी आणि इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आग्र्याच्या किल्ला परिसरात झाले आहेत. असा दावा करत देवगिरी प्रतिष्ठानतर्फे दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हायकोर्टात नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT