Breaking: साईसंस्थानच्या अधिकाऱ्या सह इतर सहा जणांना अटक... Saam TV
महाराष्ट्र

Breaking: साईसंस्थानच्या अधिकाऱ्या सह इतर सहा जणांना अटक...

साई बाबांच्या साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप व अन्य पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

गोविंद साळुंके

शिर्डी: साई बाबांच्या साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप व अन्य पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे. साई संस्थानचा कारभार पहाणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायधिश हे एका सदस्यांसह काही दिवसांपूर्वी साईमंदिराची पहाणी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. साईमंदिर सुरक्षाप्रमुख हर्षवर्धन गवळी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागप्रमुख विनोद कोते, राहूल फुंदे, अजित जगताप, व चेतक साबळे यांच्यावर हि कारवाई करण्यात आली.

सुरक्षेच्या कारणास्तव साईमंदिरातील सीसीटीव्ही फुटेज बाहेर द्यायला परवानगी नाही. साईसंस्थानने तसा ठराव केला आहे, साईमंदिर सध्या दर्शनासाठी बंद आहे. मग हे फोटो व फुटेज व्हायरल केले कुणी, यामागे न्यायधिशांची रेकी करण्याचा हेतू तर नव्हता, बदनामी करण्याचा हेतू तर नव्हता. साईमंदिर सुरक्षा व्यवस्थेशी हि बाब निगडीत आहे, त्यामुळे याप्रकरणाची चौकशी व्हावी. अशी तक्रार माहीतीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांनी तदर्थ समितीच्या अध्यक्षांकडे केल्याने पोलीस निरीक्षक गवळी यांनी चौकशी करून अहवाल तयार केला. त्यानुसार हि कारवाई करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT