Shirdi Temple, Shirdi Sai Sansthan latest Marathi news, Shirdi Sai Sansthan News Updates Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi: साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत आज अंतिम सुनावणी

या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गोविंद साळुंके

शिर्डी : शिर्डी (shirdi) येथील साई संस्थानच्या पाच विश्वस्त निवडीबद्दल उच्च न्यायालयाच्या (high court) औरंगाबाद (aurangabad) खंडपीठात आज (बुधवार) सुनावणी हाेणार आहे. एकूण १७ विश्वस्तांपैकी ११ विश्वस्तांची निवड होऊन सात महिने उलटले आहेत. उर्वरित पाच विश्वस्तांची निवड करण्यात यावी असा आदेश जारी केला होता मात्र राज्य सरकारकडून (maharashtra government) पाच विश्वस्तांची नियुक्ती करण्यासाठी विलंब झाला आहे. या प्रकरणी निर्णयाची आज अंतिम सुनावणी आहे. (Shirdi Sai Sansthan latest Marathi news)

साईबाबा संस्थानच्या (shirdi sai sansthan) विश्वस्त पदाचा तिडा तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर सुटला आहे. महाविकास आघाडी (mva) सरकारने साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे (ncp) तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे (shivsena) ठेवले आहे. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (mla ashutosh kale) यांनी १७ सप्टेंबर २०२१ कालावधीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

यावेळी त्यांचे सहकारी असलेल्या दहा विश्वस्तांनी शिर्डीत साई दरबारात येऊन पदभार स्वीकारला. आत्तापर्यंत विश्वस्त पदांची संख्या पूर्ण झाली नसल्याने धोरणात्मक निर्णय घेता आला नाही. सध्याच्या विश्वस्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) आदेशानुसार दैनंदिन कामे करण्याची परवानगी आहे. आज विश्वस्त मंडळ नियुक्ती प्रकरणी अंतिम सुनावणी आहे. पाच विश्वस्त निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळते हे पाहण महत्त्वाचं असून या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT