Shirdi, Sai Baba, bhagyashree banayat saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान; भक्तांनी ९ दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींचे दिले दान

ख्रिसमसच्या सुट्ट्या‌ आणि नवीन वर्षात साईबाबा संस्थानला कोट्यवधींच दान प्राप्त झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Shirdi Sai Baba News : ख्रिसमसच्या सुट्ट्या‌ आणि नवीन वर्षात साईबाबा संस्थानला कोट्यवधींच दान प्राप्त झालं आहे. २५ डिसेंबर ते ०२ जानेवारी या ९ दिवसात ८ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. या ९ दिवसांत तब्बल १७ कोटी ८१ लाखांचं दान साईभक्तांनी बाबांच्या चरणी अर्पण केल आहे. (Latest Marathi News)

साईचरणी वर्षभरात वर्षात तब्बल ४१८ कोटींहुन अधिक विक्रमी दान साई संस्थानच्या तिजोरीत जमा झालं आहे. विविध सरूपात प्राप्त झालेल्या दानामध्ये दानपेटीत ८ कोटी ७८ लाख ७९ हजार रुपये, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी ६७ लाख ६७ हजार ६९८ रुपये, डेबीट / क्रेडीट कार्डद्वारे २ कोटी १५ लाख १८ हजार रुपये, ऑनलाइन देणगी १ कोटी २१ लाख रुपये, मनिऑर्डर द्वारे ३२ लाख रुपये, ९० लाख ३१ हजार रुपयांचे १ किलो ८४९ ग्राम सोने, ६ लाख ११ रुपयांची १६ किलो चांदी इत्यादींचा या दानात समावेश आहे.

२५ डिसेंबर ते ०२ जानेवारी या ९ दिवसाच्या कालावधीत ५ लाख ७० हजार २८० भक्तांनी संस्थानच्या प्रसादलयात मोफत भोजनाचा लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे सशुल्क आरती तसेच दर्शनपास द्वारे संस्थानला ४ कोटी ०५ लाख, लाडू विक्रीद्वारे १ कोटी ३२ लाख तर निवास व्यवस्थेतून १ कोटी ४४ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झालंय. यादरम्यान १७१ रक्तदात्यांनी साई संस्थानच्या रक्तपेढीत रक्तदान देखील केलं आहे

८ लाख भाविकांनी घेतलं साईबाबांचे दर्शन

शिर्डीत २५ डिसेंबर ते ०२ जानेवारीमध्ये ८ लाख भाविकांनी साईदर्शन घेतलं. ५ लाखांहून अधिक भक्तांनी भोजनाचा लाभ घेतला. तर लाडू विक्रीद्वारे १ कोटींहून अधिक रुपये मिळाले. या कालावधीत अनेक रक्तदात्यांनी या काळात रक्तदान केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasuni Khakhra: घरीच १० मिनिटांत बनवा चटपटीत लसूणी खाखरा, चहाची चव वाढवेल

भाजपच्या उमेदवाराला अडवल्याने केंद्रीय मंत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाची|VIDEO

High BP: उच्च रक्तदाब हळूहळू शरीराला पोखरतो; प्रवासात हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या ४ घातक सवयी जाणून घ्या

Maharashtra Nagar Parishad Live : बोगस मतदान करताना चार-पाच जणांना पकडलं, बुलडाण्यात गोंधळ

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

SCROLL FOR NEXT