shirdi, sai baba, ram navmi 2023 saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Mandir Update: साई भक्तांसाठी मोठी बातमी; शिर्डीतील मंदिर राहणार रात्रभर खुले, जाणून घ्या कारण

Ram Navami News: यंदाच्या रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सचिन बनसाेडे

Shirdi News: येत्या ३० मार्चला रामनवमी (ram navmi 2023 latest news) माेठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी देशभरात तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात देखील विविध संस्था, मंडळे तसेच मंदिरात रामनवमी निमित्त आठवडाभरापासून धार्मिक, सामाजिक उपक्रम सुरु आहेत. रामनवमी निमित्त शिर्डीतील साई मंदिरात (shirdi sai baba mandir) तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयाेजिले आहेत (Maharashtra News)

साई भक्तांसाठी मोठी बातमी आहे. ३० मार्च रोजी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहाणार आहे. उद्यापासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सुरुवात होत आहे. ३० मार्च रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.

त्यामुळे ३० मार्च रोजी नित्‍याची शेजारती तसेच ३१ मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नसल्याचं देखील साई संस्थानकडून सांगण्यात आलंय. या तीन दिवसीय रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो पालख्यांसह दरवर्षी लाखो साई बाबा यांचे भक्त शिर्डीत दाखल होतात. उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम देखील हाेणार आहेत. यंदाच्या रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

Accident News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! रस्ता ओलांडताना ट्रेलरने उडवले, आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू; भंडाऱ्यावर शोककळा

SCROLL FOR NEXT