Shirdi Police Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Police : शिर्डीतील महिला भिक्षेकऱ्यांची मुंबईला रवानगी; ७२ जणांना घेतले होते ताब्यात

Shirdi News : राज्यातील इतर धार्मिकस्थळी भिक्षेकर्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शिर्डीत तर भिक्षेकर्यांची संख्या प्रचंड वाढली असून यात महिला भिक्षेकऱ्यांची संख्या अधिक आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहिल्यानगर)
: शिर्डीत भिक्षा मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे अनेकदा येथे येणाऱ्या भाविकांना देखील यांचा त्रास होत असतो. दरम्यान शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरूद्ध मोहीम सुरू करण्यात आली असून यातील महिला भिक्षेकऱ्यांची रवानगी मुंबईतील भिक्षेकरीगृहात करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत भिक्षेकर्यांची संख्या वाढणार का? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

एकीकडे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीक देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भिकाऱ्यांची प्रचंड गर्दी असलेल्या शिर्डीतही सफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिर्डी सह राज्यातील इतर धार्मिकस्थळी भिक्षेकर्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शिर्डीत तर भिक्षेकर्यांची संख्या प्रचंड वाढली असून यात महिला भिक्षेकऱ्यांची संख्या अधिक आहे. 

भिक्षा मिळावी यासाठी अनेकदा या भिक्षेकऱ्यांकडून भाविकांना त्रास देखील दिला जातो. त्यामुळे शिर्डी पोलिस, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांनी संयुक्त कारवाई करत ७२ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यात ६० पुरुष भिक्षेकरी तर १२ महिला भिक्षेकरी ताब्यात घेण्यात आले. यातील महिला भिक्षेकरींना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. हे भिक्षेकरी जर मुंबईत आले तर मुंबईत भिक्षेकर्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  

१५ जिल्ह्यातून आले भिक्षेकरी 

पोलिसांनी ताब्यात घेतलेले भिक्षेकरी महाराष्ट्रातील १५ जिल्हे आणि इतर सहा राज्यातील असल्याचे समोर आले आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी करून ६० पुरुष भिक्षेकऱ्यांची रवानगी अहिल्यानगर जिल्ह्यातील विसापूर येथील तर महिला भिक्षेकऱ्यांना मुंबईतील चेंबूर येथील भिक्षेकरी गृहात करण्यात आली आहे. विसापूर येथे फक्त पुरुष भिक्षेकरीगृह असून महिला भिक्षेकरीगृह चेंबूर येथे आल्याने महिलांची रवानगी तिथे करण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलिसांकडून देण्यात आली आहे. सुधारगृहात पाठवण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांना निवासासह भोजन आणि आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच शेती आणि उद्योग धंद्याबद्दल मार्गदर्शन केले जाते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT