Shirdi Nagarparishad Saam tv
महाराष्ट्र

Shirdi : शिर्डीतील दुकानदारांसाठी नगरपरिषदेची नियमावली; दर्शनी भागात लावावे लागणार दर फलक

Shirdi News : अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून आर्थिक लूट करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. फसवणूक झाल्याचे समजल्यावर अनेकदा भाविक आणि दुकानदार यांच्यात वाद देखील होतात.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही दुकानदारांकडून प्रसादाच्या नावाखाली आर्थिक लुट केली जात असते. ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी आता शिर्डीचे प्रशासन सरसावले असून शिर्डी नगरपरिषदेने व्यावसायिकांना वस्तूंचे दर ठरवून दिले आहेत. नगरपरिषदेने निश्चित केलेल्या दराने वस्तू विक्री करणे आता बंधनकारक राहणार असून दरांचे फलक देखील दुकानाबाहेर लावावे लागणार आहे. 

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येत असतात. मात्र भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही दुकानदार आणि एजंट फुल, प्रसाद, पूजा साहित्य हे मुळ किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून आर्थिक लूट करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. फसवणूक झाल्याचे समजल्यावर अनेकदा भाविक आणि दुकानदार यांच्यात वाद देखील होतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

दुकानांचे नाव, किंमत असणे बंधनकारक 

व्यवसायातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दर पत्रकास कायदेशीर मान्यता दिली आहे. या नव्या नियमांनुसार शहरातील प्रत्येक दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांना प्रशासनाने ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. या दरांच्या आतच उच्च गुणवत्तेच्या आणि योग्य वजनाच्या वस्तूंची विक्री करणे बंधनकारक असेल. प्रत्येक वस्तूवर दुकानाचे नाव, किंमत, एक्सपायरी तारीख आणि संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी स्पष्ट केले आहे. 

उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई 
नगरपरिषदेने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपरिषद आणि पोलिस विभागामार्फत संयुक्तपणे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १५ जुलै २०२५ पर्यतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर विशेष भरारी पथके शहरात नियमित पाहणी करून नियमांचे पालन होते की नाही याची कडक तपासणी करणार आहेत. तर माहितीच्या प्रसारासाठी प्रशासनाकडून क्यूआर कोड आणि सार्वजनिक ठिकाणी फलकही लावले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT