Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba: साईभक्‍तांना शिफारशीविना मिळेल आरतीची पास; मंदिर प्रवेशासाठी आधारकार्ड आवश्‍यक

साईभक्‍तांना पाससाठी शिफारशीविना मिळेल पास; मंदिर प्रवेशासाठी आधारकार्ड आवश्‍यक

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या दर्शनासाठी रोज हजारो भक्‍त (Shirdi) येत असतात. यात साई दर्शनासाठी (Sai Baba) येत असलेले काही भाविक हे आरतीसाठी इच्‍छुक असतात. याकरीता त्‍यांना पास काढावी लागत होती. याकरीता शिफारस असली तर पास लवकर मिळत होती. मात्र आता ही पास थेट दिली जाणार असल्‍याचा निर्णय साई संस्‍थानने घेतला आहे. (Breaking Marathi News)

शिर्डीच्‍या साईबाबांचे दर्शन घ्यायला रोज हजारो भाविक येत असतात. साईबाबांची सकाळी व सायंकाळी होत असलेल्‍या आरतीला भाविकांना आत प्रवेश दिला जातो. याकरीता पास आवश्‍यक असते. मात्र ज्‍यांचा वशिला असला त्‍यांना ही पास लवकर मिळत होती. यात काळाबाजार देखील होत होता. मात्र साईभक्तांना आता आरतीची पास काढण्यासाठी शिफारशीची गरज नाही. थेट पास काऊंटरवरच भाविकांना पास मिळणार आहे. पासचा काळाबाजार रोखण्यासाठी शिर्डीच्या साई संस्थानचा (Sai Sansthan) मोठा निर्णय घेतला आहे.

मंदिरात प्रवेशासाठी आधारकार्ड

साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत साई संस्थानने मोठे निर्णय घेतले आहेत. यात मोबाईल बंदीचा निर्णय अधिक कठोर करणार असून साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांना ऑनड्युटी मोबाईल वापरास बंदी केली आहे. तर शिर्डी ग्रामस्थांना केवळ ३ नंबर गेटमधून प्रवेश मिळणार असून ग्रामस्थांना साई मंदिरात प्रवेशासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा आक्रमक एल्गार

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT