Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba Mandir : शिर्डीत साई भक्ताकडून हिरे जडीत सुवर्ण मुकुट दान, किंमत नेमकी किती? VIDEO

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी देश- विदेशातून भाविक येत असतात. काही भाविक येथे दर्शन घेत दागिने किंवा रोख रक्कम दान देत असतात. त्यानुसार एका साई भक्ताने साई चरणी हिरे जडीत सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. हा मुकुट साई संस्थांकडे सुपूर्द केला आहे. 

शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. एका (Sai Baba) साईभक्ताने साईचरणी ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला असल्‍याची माहिती साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. दरम्यान हा मुकुट दान करणाऱ्या भाविकाने आपले नाव गुपित ठेवण्याची विनंती संस्थानला केली आहे. 

१२ लाख ७० हजार मुकुटाची किंमत 

साई चरणी अर्पण करण्यात आलेला सुवर्ण हिरे जडीत मुकूटाची किंमत अंदाजे १२ लाख ७० हजार रुपये आहे. हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्ण हिरे जडीत मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्‍यात आला..साईबाबांच्या चरणी अर्पण करण्‍यात आलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्‍ताने संस्थानला आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT