Shirdi Saibaba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Saibaba Gold Crown: साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा; भक्ताकडून २० लाखाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा; भक्ताकडून २० लाखाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : गुरूपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका स्थित आंध्रप्रदेश येथील साईभक्‍त वामसी कृष्‍णा विटला यांनी साईबाबांना (Saibaba) अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे. ३५५ ग्रॅम वजनाचा २० लाख रुपये किंमतीचा (Shirdi) सोन्‍याचा मुकुट वामसी कृष्‍णा यांनी साईचरणी अर्पण केला. (Live Marathi News)

शिर्डीच्‍या साईबाबांना गुरू मानणारे लाखो साईभक्त आज गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी नतमस्तक झाले. आंध्रप्रदेश येथील साईभक्‍त वामसी कृष्‍णा विटला यांनी २० लाख रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला. दुपारच्या आरतीवेळी हा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानकडे सुपुर्द करण्यात आला. वामसी कृष्‍णा आणि त्यांच्या परिवाराच्या इच्छेखातर हा मुकुट आज साईबाबांच्या मुर्तीला परिधान करण्यात आला.

साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांचे हस्ते वामसी कृष्णा आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला. वामसी कृष्णा विटला हे बालपनापासून निस्सीम साईभक्त असून ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT