Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी..फुल हार नेण्यास घातलेली बंदी उठवली; तीन वर्षानंतर वाहता येणार समाधीवर फुले

Shirdi News : जगभरात २०२० मध्ये कोरोना महामारी आली होती. या महामारीत संपूर्ण देश लॉकडाऊन झाला होता. अर्थात या महामारीत मंदिर देखील दर्शनासाठी बंद करण्यात आले होते

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबांच्या भाविकांना मागील तीन चार वर्षांपासून फुल- हार नेवून समाधीवर अर्पण करण्यास बंदी घालण्यात आलेली होती. मात्र आता हि बंदी उठविण्यात आली असून साईभक्त व शिर्डी परिसरातील भाविकांना साई समाधीवर फुल हार अर्पण करता येणार आहे. 

जगभरात २०२० मध्ये कोरोना (Corona) महामारी आली होती. या महामारीत संपूर्ण देश लॉकडाऊन झाला होता. अर्थात या महामारीत मंदिर देखील दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. कोरोना महामारी कमी झाल्यानंतर हळूहळू मार्केट, मंदिर, रेल्वे सुरु करण्यात आले होते. त्यानुसार कोरोनाच्या काळात (Shirdi) शिर्डीचे साईबाबा दर्शन देखील बंद झाले असताना हळूहळू दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र तेव्हापासून भाविकांसाठी साई समाधीवर भाविकांना फुल हार नेण्यास बंदी कायम होती. ती आजपर्यंत कायम असल्याने भाविकांना केवळ दर्शन घेता येत होते. याबाबत संभाजीनगर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून हि बंदी उठविण्यात आली आहे. 

हार फुले सुरू करावेत यासाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने याचिका दाखल केली होती. दरम्यान यावर औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय दिला असून कोरोना काळानंतर फुल हार नेण्यास घातलेली बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे भाविकांना आता (Saibaba) साई समाधीवर हार आणि फुले वाहत येणार आहेत. या निर्णयानुसार बंदी उठल्याने साईभक्तांसह फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Shraddha Kapoor - Eetha Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

Train weight distribution: अनेक टन वजन असलेल्या ट्रेन धावूनही रेल्वेचे रूळ तुटत कसे नाहीत?

Irregular meal timings: दररोज वेगवेगळ्या वेळेस जेवल्याने पोटावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची बाब

SCROLL FOR NEXT