Shirdi Saibaba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Saibaba : साईबाबांना ३५ किलो वजनाची भव्य राखी; छत्तीसगढ येथील भाविकांकडून अर्पण

Shirdi News : रक्षाबंधनानिमित्ताने छत्तीसगढ येथील भाविक प्रबोधराव यांनी हि भव्य अशी राखी साईबाबांना अर्पण केली.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
शिर्डी
: शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देशभरात असून दर्शनानिमित्ताने भाविक शिर्डीत येत असतात. दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक साई चरणी काही तरी दान देत असतात. त्याच अनुषंगाने रक्षाबंधनाचे औचित्य साधून छत्तीसगडमधील प्रबोधराव या भाविकाने साईबाबांना ३५ किलो वजनाची भव्य अशी राखी अर्पण केली आहे.

रक्षाबंधनानिमित्ताने छत्तीसगढ येथील भाविक प्रबोधराव यांनी हि भव्य अशी राखी साईबाबांना अर्पण केली. या राखीचे (Sai Baba) साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्‍यांच्‍या पत्‍नी वंदिना गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि त्‍यांच्‍या पत्‍नी ज्‍योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साईभक्‍त प्रबोधराव यांच्या हस्‍ते विधीवत पुजन करण्यात आले. यानंतर ही भव्य राखी साईबाबा समाधीला अर्पण (Shirdi) करण्यात आली.

भव्य राखीचे वैशिष्ट्य 

या राखीचे वैशिष्ट्य म्हणजे ३५ किलो वजनाची असलेली हि राखी ३६ फुट लांब आणि ५ फुट रुंद अशी भव्‍य राखी आहे. ही राखी बनवण्यासाठी १० दिवस लागले असून यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे नक्षीकाम काम करण्यात आले आहे. साईबाबांनी आपल्या हातातीत लक्ष्मीबाईंना दिलेल्या नऊ नाण्यांची थीम या राखीमध्ये साकारण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT