Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News: साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करणारे दलाल ताब्‍यात; आमिष दाखवून करतात फसवणूक

साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करणारे दलाल ताब्‍यात; आमिष दाखवून करतात फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : झटपट दर्शनासह स्वस्तात रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या २० ते २५ दलालांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. दलाल दुचाकीवरून (Shirdi) साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करतात आणि विविध आमिष दाखवून त्यांची फसवणूक करतात. (Breaking Marathi News)

शिर्डी पोलिसांकडून अनेकदा दलालांवर कारवाई करण्यात येते. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने काही दिवसातच पुन्हा भाविकांना फसवणूकीचे प्रकार सुरू होतात. भाविकांनी नकार दिल्यास अनेकदा त्यांना शिवीगाळ किंवा धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. आता शिर्डी पोलिसांनी भाविकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या दलालांना चाप लावण्यासाठी एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात केले आहे.

आज दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करणाऱ्या २० ते २५ दलालांना ताब्यात घेत शिर्डी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. अशी कारवाई पुढे देखील सुरूच राहाणार असून भाविकांनी भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन शिर्डी पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; राहुरी तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

पुण्यातील १२ दिवसांचा दारूबंदी आदेश रद्द; आता फक्त याच दिवशी ड्राय डे, हायकोर्टानंही कडक शब्दांत ओढले ताशेरे

Curly Hair Care Tips: कर्ली केस फ्रिझी होऊ नयेत म्हणून करा 'या' ७ गोष्टी; कर्ल्स दिसतील परफेक्ट आणि सुंदर

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

SCROLL FOR NEXT