sangli, shirala, Rs 2000, Police, Women, Arrests, ICICI Bank saam tv
महाराष्ट्र

Rs 2000 च्या नोटा घेऊन बँकेत आली महिला, डिपॉझिटही केल्या; पण त्यानंतर...

Sangli News : बॅंक अधिका-यांनी तत्काळ पाेलीस ठाण्यात धाव घेतली.

विजय पाटील

Sangli News : दाेन हजार रुपयांच्या बनावट नाेटा प्रकरणी सांगली जिल्ह्यात एका महिलेस पाेलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेची पाेलिस कसून चाैकशी करीत आहेत. शिराळा पाेलिसांकडून बनावट नाेटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातील शिराळा शहरातील आयसीआयसीआय बँकेत एक महिला काल दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी महिलेने जमा केलेल्या नोटांमध्ये बॅंक कर्मचा-यांना तब्बल 13 बनावट नोटा आढळून आल्या.

याबाबतची माहिती तातडीने बँकेच्या अधिकार्‍यांनी पोलिसांनी कळवली. त्यानंतर बॅंक अधिका-यांनी संबंधित महिलेच्या विराेधात तक्रार दिली. त्यानुसार शिराळा पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली. तिच्याकडे दोन हजार रुपयांच्या 13 बनावट नोटा कोठून आल्या याबाबतचा तपास शिराळा (shirala) पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

Maharashtra News Live Update: जात पडताळणी समिती रद्द करा मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी

Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

जरांगे पाटलांचा सरकारला थेट अल्टिमेटम! 'या' १३ मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत रणांगण, पाहा संपूर्ण यादी

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

SCROLL FOR NEXT