Boat drowning in harne port saam tv
महाराष्ट्र

रत्नागिरी : दापोलीच्या हर्णे बंदरात बुडाली बोट

दापोलीतील हर्णे बंदरात बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रत्नागिरी : दापोलीतील हर्णे बंदरात (Harne port) बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चांगा भोईनकर ह्यांच्या मालिकीची असलेली बोट हर्णे बंदरात बुडाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी (No casualties) झाली नसल्याचं समजते. हर्णे बंदरात बोट बुडाल्याची दुर्देवी घटना आज शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती दापोलीच्या तहसीलदारांनी दिली आहे.

दापोली तालुक्यातील हर्णे येथील बंदरामध्ये उटंबर येथील एका नौकेला लाटांच्या तडाख्यामुळे पूर्णपणे जलसमाधी मिळाली. सुदैवाने यामध्ये वित्तहानी प्रचंड झाली असून जीवितहानी मात्र टळली आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात मासेमारी करणारी उटंबर येथील चांगा दामा भोईंनकर यांची IND-MH-4- MM-1'अन्नपूर्णा' ही दोन सिलेंडरची नौका गुरुवारी ५ मे २०२२ रोजी रात्री उशिरा हर्णै बंदरातून सर्व सामान भरून मासेमारीसाठी गेली होती. सध्याच्या काळात मासेमारी करिता खलाशी देखील मिळत नसल्याने चांगा भोईनकर व त्यांचा मुलगा नंदकुमार असे दोघेच नौकेवर मासेमारीला गेले होते.

आज ७ मे २०२२ रोजी सकाळी हे दोघेही हरेश्र्वरमध्ये मासेमारी करत होते. त्याचवेळी अचानक नोकेवरील मशीन बंद पडले. त्यामुळे हे दोघेही खूप चिंतेत पडले. त्याचवेळी त्यांनी जवळ असलेल्या पाजपंढरी येथील हेमा परशुराम चोगले यांची 'अल हम्द' या नौकेला आवाज मारून जवळ बोलावले व सदरच्या नौकेने दोरी बांधून भोईंनकर हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपली नौका हर्णै मध्ये घेऊन यायला निघाले. नौका घेऊन अगदी कनकदुर्ग किल्ल्याजवळ आले होते.

गेले ८ ते १० दिवस समुद्रातील वातावरण खूपच खराब झाले आहे. सकाळी उत्तरेकडून जोरदार वारे वाहत होते. कनकदुर्ग किल्ल्याजवळ आल्यावर लाटांचे जोरदार तडाखे बसत होते. त्याचमुळे मोठ्या लाटांचे तडाखे बसून नौकेची नाळच तुटली आणि नौकेत पाणी शिरून नौका जाग्यावरच बुडाली. त्यामुळे नौकेच पूर्णपणे नुकसान झाले आहे. बुडाल्यावर त्याच चोगले यांच्या नौकेच्याच साहाय्याने किनाऱ्याजवळ आणली गेली. नौका बुडाली कळताच हर्णै फत्तेगड येथील सर्व मच्छीमार वाचवण्यासाठी धावत आले तसेच ओमकार मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन हरेश कुलाबकर तातडीने हजर झाले.

फत्तेगडावरील मच्छीमार बांधवांनी नौका बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. नौका ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला परंतु बुडालेली नौका अजूनही बाहेर काढण्यात अपयश येत आहे. अजूनही नौका बुडालेल्या अवस्थेत हर्णै बंदरातच आहे. पूर्णपणे जलसमाधी मिळाल्यामुळे सर्व सामान वाहून गेले आहे. तसेच मारून आणलेली मासळी देखील वाहून गेली आहे. दरच्या घटनेचा मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी पंचनामा केला. अंदाजे सदर नौकेला जलसमाधी मिळाल्यामुळे ५ लाखांचे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

SCROLL FOR NEXT