kunal kamra SAAM TV
महाराष्ट्र

Kunal Kamra: बूक माय शो'वरुन कामराला हटवलं, कलाकाराच्या यादीतूनही नाव काढलं, शिंदे सेनेकडून कामराची ऑनलाईन कोंडी, VIDEO

Political Controversy: शिंदे सेनेनं कॉमेडीयन कुणाल कामराची कोंडी केली आहे. कारण शिंदेसेनेच्या तक्रारीवरुन 'बूक माय शो'ने कामराचा कंटेन्ट हटवला आहे. इतकच नाही तर कलाकारांच्या यादीतूनही त्याचं नाव काढलं आहे. पाहूया एक रिपोर्ट

Girish Nikam

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन गीतातून निशाणा साधणाऱ्या कुणाल कामराची आता कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिंदेंवर टीका करणे कामराला भोवलंय. कारण बुक माय शोनं कॉमेडीयन कुणालचे जूने कन्टेंट काढून टाकलेत. तसंच कलाकारांच्या यादीतूनही त्याला काढून टाकलंय. शिंदेसेनेचे नेते राहुल कनाल यांनी यासंदर्भात 'बूक माय शो'ला पत्र लिहिलं होतं. या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया...

कामरा हा भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य करून निंदा आणि बदनामीच्या सतत मोहिमेत गुंतलेले दिसतोय. कामरा यांच्या पूर्वनियोजित, स्क्रिप्टेड, प्रक्षोभक आणि दुर्भावनापूर्ण विधानांनी सातत्याने नैतिक आणि कायदेशीर सीमा ओलांडल्या आहेत. अशा टिप्पण्यांमुळे केवळ जनतेच्या भावना दुखावल्या जात नाहीत तर सामाजिक एकोपा बिघडवण्याचीही क्षमता असते.

दरम्यान कामराच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी शिंदे सेनेनं केली आहे. जे प्रेक्षक त्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचाही पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे.

तर कामराला खार पोलीस स्थानकात उपस्थित राहण्यासाठी पोलिसांनी चौथं समन्स बजावलंय. दुसरीकडे कुणाल कामराने मद्रास हायकोर्टामधून सात एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मिळवला आहे.

आता मुंबई पोलिसांच्या कारवाईतून कुणाल कामरा सहीसलामत सुटणार की शिंदे गट त्याची आणखी कोंडी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

SCROLL FOR NEXT