SHINDE SENA SETBACK: MANMAD COUNCILLOR DISQUALIFIED FOR 6 YEARS IN NASHIK saam tv
महाराष्ट्र

शिंदेसेनेला मोठा हादरा! नगरसेवकाचे 6 वर्षांसाठी पद रद्द; राजकारणात खळबळ

Corporator Sheikh Majid Ibrahim Disqualified for 6 Years: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेतील मोठी राजकीय घडामोड! जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नगरसेवक शेख मजीद इब्राहिम यांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आले असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : मनमाड नगरपरिषदेच्या राजकारणातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. प्रभाग क्रमांक ८-ब मधून नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शेख मजीद इब्राहिम यांना ६ वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात आदेश जारी केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान शेख मजीद इब्राहिम यांनी जात प्रमाणपत्र वैधता पडताळणीसाठी सादर केले होते. मात्र, नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयश आल्याचाही उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ चे पोटकलम १-ब (अ) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी शेख मजीद इब्राहिम यांना नगरपरिषदेच्या सदस्यपदासाठी ६ वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. दरम्यान, या आदेशाची प्रत राज्य निवडणूक आयोग तसेच मनमाड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. या निर्णयानंतर मनमाड नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT