Sanjay Shirsat On Haryana Election Saam
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: महाविकास आघाडी टिकणार नाही; हरियाणाच्या निकालावरून शिरसाट यांचं मविआवर शरसंधान

Sanjay Shirsat On Haryana Election: शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी हरियाणाच्या निकालावरून महाविकास आघाडीवर टोमणा मारलाय.

Bharat Jadhav

Sanjay Shirsat On Haryana Election: हरियाणा विधानसभेच्या निकालाने राज्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये बुस्टर मिळाला आहे . या निकालामुळे नेत्यांमध्ये नवचेतना मिळाल्याचं दिसत आहे. कालचा निकाल आमच्यासाठी आशादायी आहे. शिंदे सरकारला लोक भरघोस पाठिंबा देतील, असा विश्वास वर्तवत महायुतीतील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोमणा मारला.

हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल लागल्यानंतर हरियाणा काँग्रेसकडे झुकेल, अशा स्वप्नात होते. पण तो निकाल लागल्यानंतर कभी खुशी कभी गम दिसले. काँग्रेसने जल्लोष साजरा केला पण त्यानंतर त्यांची दाणादाण झाली. काहींनी निकाल येण्याअगोदर बोलू लागले. येतो झांकी है असे बोलू लागले. त्यामुळे महाविकसं आघाडीत मतभेद सुरू झाले असल्याचं आमदार शिरसाट म्हणालेत. पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले, काँग्रेस बॅफूटवर गेल्यावर युबाठा नेते बॅनर लावू लागलेत, आता याचा अर्थ की, काँग्रेस ला मागे येऊन उबाठां चे एकले पाहिजे. आम्ही शुभेच्छा देतो त्यांची भूमिका कायम राहावी, ही महविकसं आघाडी आता टिकणार नाही.

बॅनरमुळे कोणी मुख्यमंत्री होत नाही

बॅनर बाजी सुरू राहणार आहे. बॅनर लावल्याने कोणी मुख्यमंत्री होत नसते. असा टोलाही त्यांनी फडणवीसांच्या समर्थकांना मारला. नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुन्हा येणार' अशा आशयाचे लिहिण्यात आलाय. या बॅनरची सध्या चर्चा रंगलीय. शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचाय: पंतप्रधान मोदी

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहेत. आता महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे, असं विधान करत विजयाचा विश्वास वर्तवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने ७६०० कोटी रुपयांच्या विकासकामाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

हरियाणाच्या निकालावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये वाद जुंपलाय. 'अहंकारी काँग्रेसचा पराभव झाला', असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केली. . हरियाणाच्या निकालावरून मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या टिकेला उत्तर देत अहंकार येत्या निवडणुकीत दिसून येईल असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT