Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: भाजप-शिंदे गटात जागावाटपावरून जुंपली? शिवसेनेच्या बड्या नेत्याने भाजपला दिला थेट इशारा

धाराशिव लोकसभेच्या जागा वाटपावरूनही दोन्ही पक्षात ठिणगी पडल्याचे समोर आले आहे.

डॉ. माधव सावरगावे

Tanaji Sawant News: राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढविण्यावर भाष्य केलं जात आहे. मात्र,दुसरीकडे लोकसभेच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये जुंपली आहे.

धाराशिव लोकसभेच्या जागा वाटपावरूनही दोन्ही पक्षात ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे. यावरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

धाराशिव लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. 'शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आम्हाला सहज घेऊ नका, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाला दिला आहे. गेल्या लोकसभेला लढलेल्या 23 पैकी 23 जागा शिवसेना लढवणार असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभेच्या जागेवरून भाजपाकडून केल्या गेलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांना आज सावंत यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. धाराशिवची लोकसभेची जागा ही शिवसेनाच लढवणार असल्याचे ही सावंत यांनी ठासून सांगितलं. काही दिवसापूर्वी भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी धाराशिवची जागा भाजपा लढवणार असल्याचा दावा केला होता.

सावंत यांनी आज त्याला प्रत्युत्तर देत धाराशिवची जागा शिवसेना लढवणार असल्याचे ठणकावून सांगितलं. सावंत यांच्या या दाव्यामुळे भविष्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना व भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत.

शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपची फिल्डिंग?

दरम्यान, भाजपने शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात देखील संयोजक नेमल्याची माहिती आहे. शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.

भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघात देवयानी फरांदे तर शिर्डीत विखे पाटील यांना संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यात आता धाराशिवच्या जागेवर भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दावा केल्याने शिंदे गटाची अस्वस्थता वाढली असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT