Sanjay Shirsat News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांच्या 'त्या' विधानाला शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तारासाठी...'

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

sanjay shirsat News : अहमदनगरमध्ये अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक आमदार कोट शिवून तयार आहेत असा टोला शिंदे फडणवीस सरकारला लगावला होता. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर अजित पवारांचे संबंध सर्वांशीच चांगले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी अजित पवारांनीच पुढाकार घ्यावा, असाही टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे. (Latest Marathi News)

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, 'अजित पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना कुठे काय बोलावं हे निश्चित कळतं. त्यांनी आमची सर्वांची चिंता केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. अजित पवार यांचे संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांशी चांगले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी पुढाकार घ्यावा'.

'काही गोष्टी तुम्हालाही माहीत आहे. त्या काळानुसार आणि वेळेनुसार केल्या जातात. ती वेळ आतापर्यंत आली नसेल. म्हणून हा मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला आहे. योग्य निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतली. हा महाराष्ट्र आपल्या मनातील पाहील, असे म्हणत शिंदे गटाटे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार ?

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते की, महिलांना मंत्रिमंडळात ५० टक्के आरक्षण आहे. परंतु या राज्य सरकारला एकही मंत्रिमंडळात स्थान देता आले नाही. प्रत्येक आमदार मंत्री होण्यासाठी नवस बोलत आहे. अनेकांनी नवीन कोट शिवून ठेवले आहेत. परंतु मंत्रिपदासाठी शपथ घेण्याचे येत नसल्याने बिचारे हतबल झाले आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT