Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: ग्रामपंचायत निकालानंतर गावात वाद; सोशल मीडियावरुन ३०२ करण्याची धमकी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा

बीडच्या म्हाळस जवळा गावात ग्रामपंचायत निकालानंतर वाद झाल्याची घटना समोर आली आहे

विनोद जिरे

Beed Crime News : बीडच्या म्हाळस जवळा गावात ग्रामपंचायत निकालानंतर वाद झाल्याची घटना समोर आली आहे. गावात लाकडी दांडे घेऊन, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

बीडच्या (Beed) म्हाळस जवळा गावात ग्रामपंचायतीच्या निकालानंतर वाद झाल्यानंतर बीडमध्ये शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर रात्री ११:३० वाजता हा प्रकार घडल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे खोट्या केसमध्ये अडकवीन म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं देखील नमूद आहे. या वादानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निकालानंतर खांडे यांच्या नातेवाईकांकडून खुलेआम सोशल मीडियावरुन 302 करण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर याप्रकरणी कुंडलिक खांडेसह भाऊ गणेश खांडे, दुसरा भाऊ बाळासाहेब खांडे व अन्य एकासह कार्यकर्त्यांवर बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, 'कुंडलिक खांडे यांच्याकडून खोट्या केसच्या धमक्या दिल्या जात आहेत. खुलेआम धमकी दिली जातेय. त्यामुळं गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं आम्हाला सुरक्षित वातावरण करून द्या, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोनं १२,४८९ रुपयांनी स्वस्त, तर चांदीचे दर ₹४०,०००नी घसरले; इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू

काँग्रेसच्या खासदाराचा तडकाफडकी राजीनामा! राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

SCROLL FOR NEXT