Manoj Jarange Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : शिंदे सरकारचा मोठा निर्णय; आता मनोज जरांगेंना मिळणार सरकारी सुरक्षा

Manoj Jarange Latest News: जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यावेळी शिंदे सरकारने सर्व मागण्याही मान्य केल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange Patil News:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा लावून धरला आहे. काही आठवड्यांपूर्वी जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यावेळी शिंदे सरकारने सर्व मागण्याही मान्य केल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाच्या मागणसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून दोन कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे यांना आता जिल्ह्यातील पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जात होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांना आता कायमस्वरूपी दोन पोलीस कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरवली जाणार आहे. गोदी पोलिस स्टेशनच्या दोन कॉन्स्टेबलची नियुक्ती ही केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी कोणी केली होती?

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने जरांगे यांच्या सुरक्षेसाठी २४ तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आली होती.

मनोज जरांगे यांची राज ठाकरेंना विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्यावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'राज ठाकरे यांना विनंती आहे की, तुम्हाला मराठा समाज खूप मानतो. तुम्ही मराठा समाजात गैरसमज पसरवू नका. हे मराठा समाजाला पचणार नाही. तुम्ही दोन वेळा उलटसुलट विधान केले आहेत. माझ्यासह मराठा समाजातील लाखो पोर तुम्हाला मानणारे होते. परंतु मराठा बांधवांना काय मिळाले? काही नाही. तुम्ही सरकारची सुपारी घेतल्यासारखे बोलू नका. हे तुमच्या सारख्याला शोभत नाही, असं जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharadi devi jatra: जत्रेक येऊकच व्हया! कधी आहे यंदाच्या वर्षी आंगणेवाडीची जत्रा?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

IND vs Pak : ठरलं! गरीब पाकिस्तानानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, भारताविरुद्ध T20 वर्ल्डकप सामना खेळणार नाही

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT