shivsena news  saam tv
महाराष्ट्र

शिवसेनेतील उरलेले खासदारही आमच्या संपर्कात; शिंदे गटातील खासदाराचा मोठा दावा

आमच्या संपर्कात शिवसेनेचे उर्वरित खासदारांपैकी अनेक खासदार आणि उरलेल्या १५ आमदारांपैकी काही आमदार आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला.

संजय जाधव

Buldhana News : शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवेसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. साथ सोडल्यानंतर या आमदार आणि खासदार यांच्याकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील भाषणातून बोलताना १०० कोटी मातोश्री ओके, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली होती.

सचिन वाझे मार्फत मुंबईतील बार, अवैध धंध्यावाल्याकडून जमा केले जात होते. सर्व १०० खोके मातोश्रीवर जात होते हे खरं होतं म्हणून वाझे तुरुंगात आहे, असेही खासदार जाधव बोलले होते. या वक्तव्यावरून खासदार जाधव यांनी युटर्न घेतला आहे. तसेच आमच्या संपर्कात शिवसेनेचे उर्वरित खासदारांपैकी अनेक खासदार आणि उरलेल्या १५ आमदारांपैकी काही आमदार आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. (Maharashtra Political News In Marathi )

बुलढाण्याच्या मेहेकरमध्ये सत्तांतरानंतर पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणातून बोलताना १०० कोटी मातोश्री ओके, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, 'तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराचे ७५ टक्के शिवसैनिक आणि संघटना लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि तेव्हा सातत्याने आमच्या आमदार लोकांवर आरोप केले जात होते. 'पन्नास खोके एकदम ओके' असे आरोप आमदारांवर केले. मात्र, मोठ्या प्रमाणावर संघटनेचे लोकप्रतिनिधी दूर होत आहेत ते आत्मपरीक्षण करण्याऐवजी डोके फोडू याला त्याला मारा, अशी भूमिका घेण्यात आली. सचिन वाझेचं समर्थन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केले होते'.

'अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे देखील तुरुंगात होते, त्यांचे देखील समर्थन करण्यात आलं होतं. आरोप तर कुणावरही करण्यात येतात. काही उद्धव ठाकरे यांचे नाव घेतलेलं नाही, असं म्हणत आज शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या वाझेकडून मातोश्रीवर शंभर खोके पोचत होते या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे .

'आमच्या संपर्कात उर्वरित खासदारांपैकी अनेक खासदार आणि उरलेल्या १५ आमदारांपैकी आमदार आहेत, असा सूतोवाच खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तर तीन ते चार खासदार आमच्याकडे येऊ शकतात. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी आम्ही सर्व पुरावे सादर केले आहे. धनुष्य बाण आमच्याकडे येईल. त्यामुळे शिवसेनेतील सर्व प्रतिनिधी आमच्याकडे येतील, असे खासदर प्रतापराव जाधव म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajpal Yadav: 'मला पुन्हा जेलमध्ये पाठवा...' चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावुक; न्यायाधीशांनी फटकारले

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

IPL 2026: पराभव KKR चा, फटका मात्र CSK ला; हैदराबादच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण

एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, सिनिअर काँग्रेस नेते अन् चालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT