Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

सांगलीत वीज पडून मेंढपाळ आणि दहा मेंढ्याचा मृत्यू

रांमचंद्र पांडुरंग गडदे असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

विजय पाटील

सांगली - जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे मेंढ्याच्या कळपावर विज पडून मेंढपाळ आणि दहा मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. रांमचंद्र पांडुरंग गडदे असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. नांगोळे येथील कवठेमहांकाळ जत रस्त्यावर काल सायंकाळी मेंढ्याच्या कळपावर आचानक विज पडली. त्यात मेंढपाळ गडदे गंभीर भाजले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर दहा मेंढ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हे देखील पहा -

घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात करण्यात आली आहे. रामचंद्र गडदे हे नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्या चारावयास घेऊन गेले होते. दिवसभर मेंढ्या चारुण सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी येत होते. कवठेमहांकाळ जत रस्त्यावर पिंपळवाडी बस थांब्याच्या पुढे लोखंडी पुलाच्या जवळ नांगोळे गावच्या हद्दीत आले असता वादळी वारे व पाऊस जोरदार सुरू झाला.

याच वेळी जोरदार विजांचा गडगडाट होऊन रामचंद्र गडदे यांच्या अंगावर व मेंढ्याच्या कळपावर विज कोसळली त्यात ते गंभीर भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गडदे यांचा भाचा सुनिल हुबाले यांनी कवठेमहांकाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र डाँक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. गडदे यांच्या दहा मेंढ्या मेल्याने त्यांचे सुमारे दोन लाखांवर नुकसान झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT