Shashikant Shinde & Sharad Pawar SaamTV
महाराष्ट्र

साहेब! मला पक्षातील ज्येष्ठांचा त्रास झाला : शशिकांत शिंदे

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा नुकताच सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभव झाला.

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) निवडणुकीत राजकारण झाल ,पक्षातील काही नेत्यांची विराेधकांना अप्रत्यक्षपणे मदत झाली. पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करणार नाही. तुमच्या पराभवास शिवेंद्रराजे जबाबदार आहेत हे वास्तव आहे परंतु राष्ट्रवादीने विराेधकांना रसद पुरवली याबाबत तुम्ही का बाेलत नाही या प्रश्नावर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले ही बाब मी पक्षाध्यक्षांशी बोलेन. मला पक्षातील ज्येष्ठ लोकांचा त्रास झाला आहे असे आज आमदार शशिकांत शिंदे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता सांगून टाकले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांसमाेर बॅंकेच्या निवडणुकीत काेणी कसे राजकारण केले यावर प्रकाशझाेत टाकला. यावेळी त्यांनी मी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताे हे चुकीचे आहे का असा प्रश्न सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.

आमदार शिंदे म्हणाले खासगीत अनेक लाेक मला सांगतात तुम्ही केवळ तुमचा मतदारसंघ पहा. कशासाठी सर्वांना अंगावर घेता. पक्ष वाढीसाठी मी प्रयत्न करताे त्यामुळे माझे शत्रू वाढताहेत असे अनेकजण मला सांगतात. परंतु राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील कार्यकर्त्यास बळकटी देण्याचे काम माझे आहे परंतु काही लाेकांना भविष्यातील चिंता वाटत असल्याने कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला. पॅनलच्या प्रमुखांनी अन्य उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केले. तसं पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून किती प्रयत्न केले असा प्रश्न आमदार शिंदे यांनी विचारला. शिवाजीराव महाडीक, नंदकुमार माेरे यांचा का पराभव झाला याचा विचार हाेणे गरजेचे आहे असे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान मी दिलदारपणे पराभव स्विकारला. विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. माझा पराभव मी उतलाे नाही, मातलाे नाही. परंतु काही लाेक जिंकल्यानंतर पडद्यामागचा सूत्रधार नाचला. हा कट काेणी रचला हे सर्वांसमाेर आले अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT