Sharad Pawar
Sharad Pawar  SAAM TV
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'ते असं बोलतील वाटलं नव्हतं', फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी गौप्यस्फोटावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Chandrakant Jagtap

>>सचिन गड

Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेऊन अशी वक्तव्य करतील अस मला कधी वाटलं नाही, अशा शब्दात पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

कोणत्या आधारावर फडणवीसांनी हे वक्तव्य केल्याचे विचारले असता तुम्ही त्यांना विचारा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांनी केलेला गौप्यस्फोट असत्य म्हणजेच खोटा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.(Latest Marathi News)

दरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fanavis) आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सकाळच्या शपथेविषयी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपतविधी झाला होता असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आतापर्यंत स्पष्ट वक्तव्य केले नसली तरी फडणवीस यावर स्पष्टच बोलले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

SCROLL FOR NEXT