uddhav thackeray and sharad pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार , उद्धव ठाकरे मोदी सरकारमद्ये जाणार, दिग्गज नेत्याचा दावा

Bacchu Kadu : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे नाराज असतानाच ठाकरेंची भाजपसोबत जवळीक वाढल्याचं चित्र आहे. त्यातच दिग्गज नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics News : पुढील काही दिवसांमध्ये केंद्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. पंढरपूरमध्ये बोलताना बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केलाय. (Bacchu Kadu claims Sharad Pawar and Uddhav Thackeray might align with Narendra Modi in upcoming political shift)

बच्चू कडू म्हणाले की, ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत. ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत आहे. त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच राऊत यांचा प्रयत्न आहे.

अजित पवार यांच्यावर बच्चू कडू भडकले -

एक रुपया पीक विम्यावरून बच्चू कडू अजित पवारांसह कृषी मंत्री माणिकरावांवर भडकले. अजित पवार म्हणतात माहित नाही आणि माणिकराव म्हणतात बजेट नाही, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, एक रूपयात पीक विमा योजना बंद होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर बच्चू कडू यांनी समाचार घेतला.

बॅटगे तो कटेंगे म्हणत होता मग दिव्यांग हिंदू नाही का? असा सावलही यावेळी त्यांनी केला. महाराष्ट्राचा इतिहास आधी तर बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच 50 ते 70 हजाराचे लीड मिळायचं. आता कुणालाही एक एक लाखाचं लीड मिळते, असा फरक एकाएकी कसा पडला, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT