Aditi Tatkare on Sharad Pawar and NCP Split Latest News SAAM TV
महाराष्ट्र

Political News : शरद पवार राष्ट्रवादीचे देशात नेतृत्व करतात, पण पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोग ठरवेल - तटकरे

Nandkumar Joshi

शुभम देशमुख, भंडारा

NCP Split Latest Breaking News :

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे नेतृत्व करतात; मात्र राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे, हे निवडणूक आयोग ठरवेल, असे विधान महिला व बाल विकास मंत्री तथा अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांनी केले. भंडारा जिल्हाच्या मोहाडीत आयोजित सरपंच सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आणि चिन्ह माझे आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केल्यानंतर अजित पवार यांनी मी भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढणार नसून, राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवेल, असे वक्तव्य केले होते. आदिती तटकरेंना याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता, हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे चुकीचे ठरेल, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

'नीलम गोऱ्हे चुकीची कारवाई करणार नाहीत'

नीलम गोऱ्हे या चुकीची कारवाई करू शकत नाही, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्तावाबाबत तटकरे यांना प्रश्न विचारल्यावर त्या बोलत होत्या. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर, मी या समितीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. त्यावर नीलम गोऱ्हे या अनुभवी नेत्या आहेत, त्या चुकीची कारवाई करू शकत नाही, असे तटकरे म्हणाल्या.

बालमृत्यूचे प्रमाण कमी

राज्यात यावर्षी बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. बालविकास विभागाने उत्तम काम केले आहे, असे तटकरे म्हणाल्या. भविष्यात शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम केले तर हे प्रमाण आणखी कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT