Sharad Pawar on Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar on Devendra Fadnavis: कोण पार्सल आहे हे निपाणीतून सांगेन; फडणवीसांच्या त्या टीकेचा पवार घेणार समाचार!

Sharad Pawar on Devendra Fadnavis: राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? अशी टीका फडणवीसांनी केली होती.

विश्वभूषण लिमये

Sharad Pawar on Devendra Fadnavis: राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीमधील सभेतून केली होती. त्यांच्या या टीकेचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (Breaking Marathi News)

कोण पार्सल आहे हे देवेंद्र फडणवीस यांना निपाणीतून सांगेन. मी निपाणीला जाणार आहे. कोण पार्सल आहे. या सगळ्या संदर्भात मी तिथे बोलणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निपाणीत गेल्यानंतर शरद पवार फडणवीसांच्या टीकेला काय उत्तर देणार? याकडेच सर्वांच लक्ष असेल. (Latest Marathi News)

'कार्यकर्त्यांसाठी निवृत्तीचा विचार बदलला'

कार्यकर्त्यांसाठी मी निवृत्तीचा विषय बदलला, महाराष्ट्राचं राजकीय चित्र वेगाने कसं बदलेल, हाच माझा प्रयत्न आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल आहे. असंही शरद पवार यांनी नमूद केलं आहे. त्याचबरोबर देशात मोदींना पर्याय देण्याची गरज आहे, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटकात आपलेच उमेदवार निवडून यावेत यासाठी अनेक राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निपाणीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्याने फडणवीस यांनी राष्ट्रवादीची संभावना साडेतीन जिल्ह्याचा पक्ष अशी केली. राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Old Photos: प्राजक्ता माळी १३ वर्षांपूर्वी कशी दिसायची? पाहा अभिनेत्रीचे क्यूट जुने फोटो

Early Cancer Signs in Legs: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात 5 मोठी लक्षणं

Maharashtra News Live Update: लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी

Assembly Elections: पाच राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाजणार विधानसभा निवडणुकांचं बिगुल; काय आहे सरकार आणि आयोगाचा प्लॅन?

Tushar Deshpande: मुंबई टी-२० लीगच्या अंतिम सामन्यात भर मैदानात राडा; विकेट जाताच गौरव थेट तुषार देशपांडेची नडला, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT