Sharad Pawar - Rahul Gandhi saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On Savarkar Dispute: सावरकर वादात शरद पवारांची मध्यस्थी, राहुल गांधी यापुढे सावरकरांचा मुद्दा टाळणार?

Savarkar controversy: आता राहुल गांधी यापुढे सावरकरांचा मुद्दा टाळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Shivaji Kale

Maharashtra Politics : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यारून (Savarkar controversy) देशाचं राज्यासह देशाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

स्वत: उद्धव ठाकरे यांनी मालेगावातील सभेतून सावरकर आमचे दैवत आहेत आणि त्यांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु आता दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यापुढे सावरकरांचा मुद्दा टाळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काल दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीत सावरकरांच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील आपलं मत मांडलं. पवार म्हणाले, सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. त्यांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत असे मत पवारांनी मांडले. पवारांच्या या मतावर अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील पवारांच्या मताचा मी आदर करतो असे बैठकीत म्हटले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या या बैठकीत शिवसेनेने निर्माण केलेल्या दबावाला यश आले आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सावरकर मुद्द्याला बगल देणार का हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT