Sharad Pawar Group Symbol New Symbol Saam Digital
महाराष्ट्र

Sharad Pawar Group Symbol New Symbol: शरद पवार गटाचं नवं चिन्ह 'तुतारी', निवडणूक आयोगाची घोषणा

Sharad Pawar Group News: एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष चिन्ह दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> प्रमोद जगताप

Sharad Pawar Group Symbol New Symbol:

एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष चिन्ह दिलं आहे. तुतारी हे आता शरद पवार गटाचं नवीन पक्ष चिन्ह असणार आहे. पवार गटानेही आयोगाने दिलेलं चिन्ह मान्य केलं आहे.

शरद पवार गटाकडून याबाबत ट्वीट करत सांगण्यात आलं आहे की, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं, ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्विटमध्ये पुढे लिहिलं आहे की, ''महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे'' (Latest Marathi News)

यावरच आपली प्रतिकिया देताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ''तुतारी ही युद्धाची निशाणी आहे. यापुढे जो रणसंग्राम होणार आहे, त्याची तयारी करताना तुतारी वाजवली की लोक सोबत येतील. हे नकळत भाग्यात आलं आहे. युद्धाला वेळ काळ नसतो.''

ते म्हणाले, आमचं चिन्ह थांबवावं, आमच्या पक्षाला नाव मिळू नये, म्हणून प्रयत्न झाले. मात्र काहीही झालं नाही. आम्हाला नावही मिळालं आणि चिन्हही मिळालं. हे चिन्ह इशारा देऊन गेलं, आमची युद्धाची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियाच्या काळात हे चिन्ह घरोघरी पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT